तो ३३ वर्षांचा. ती २१ची.
तो एक स्ट्रगलिंग स्टैंड-अप कॉमेडियन, ती खाजगी कंपनीमधील प्रतिभावान अधिकारी. तो पंजाबी. ती रूढीपरंपरा जपणाऱ्या जैन कुटुंबातील. तो घटस्फोटित. तिच्या आयुष्यात कधी बॉयफ्रेंडही आला नाही.
खरंतर त्यांनी एकत्र यायलाच नको होतं. पण ते वेगळे राहूच शकत नव्हते.
‘१२ वर्षः माझी विस्कळीत प्रेमकथा’
साकेत आणि पायल; वय, राहणीमान, संगोपन, विचारसरणी यापैकी कशातच साम्य नाही, तरीही ते एकमेकांकडे का आकर्षित झाले? याचं उत्तर त्यांच्याकडेही नाही. ही फक्त केमिस्ट्री आहे की मनाच्या अंतरंगातील वेगळं काही… हा निव्वळ वेडेपणा आहे, की नुसतीच वासना, की निखळ प्रेम ?
वाचकांना गुंतवून ठेवणारी आणि मनोरंजक अशी ही कादंबरी. एखादी व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे हे कसं ओळखायचं, या मूलभूत आणि महत्त्वपूर्ण प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते, विशेषतः तेव्हा, जेव्हा आजूबाजूचे सगळेच लोक आणि परिस्थितीही ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नाही असं जोरजोरात सांगत असेल.
भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांचे लेखक चेतन भगत यांची एक नवीन, शक्तिशाली प्रेमकथा जी तुम्हाला हसवेल, कधी कधी रडवेलही आणि प्रेमाबद्दल तुम्हाला माहीत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर पुनर्विचार करायला लावेल.






Reviews
There are no reviews yet